4 April 2012

माहिती अधिकार कायदा संपवण्याचा कट हाणून पाडा


माहिती अधिकार कायदा संपवण्याचा कट हाणून पाडा

माहिती अधिकार कार्यकर्त्यानो एक व्हा ! माहिती अधिकार कायदा वाचवा !!
दीडशे शब्दात अर्ज करण्याची सक्ती हाणून पाडा.

  माहिती अधिकार कायदा निष्प्रभ करण्याचा प्रयत्न शासन व प्रशासनातील काही लोक करीत आहेत.महराष्ट्र शासनाने  माहिती मागविण्यासाठी केवळ दीडशे शब्दाची सक्ती केली असून हि
( कु ) सुधारणा राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे माहितीअधीकाराचा गळा दाबायला निघाले आहेत.
 केवळ दीडशे शब्दाच्या सक्तीमुळे कायद्याच्या मूळ उद्देशालाच धक्का पोहचत आहे.शासनाच्या या कुटील निर्णयाच्या विरोधात न्यायालयात आव्हान दिले जाईल.  माहिती अधिकार कायदा मारून टाकायचा हेच सत्ताधारी लोक व प्रशासनातील मंडळींनी ठरविलेले आहे.या भ्रष्ट मंडळीचा कट हाणून पडायचा असेल तर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी  संघटीत होऊन सरकारवर दबाव टाकायला हवा. 
        महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्राची प्रत येथे पहा

No comments:

Post a Comment